चीनी सैन्याची आता उत्तराखंडमध्ये घुसखोरी
चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. यावेळेस चिनी सैन्याने उत्तराखंडातील बाराहोतीमध्ये मागील आठवड्यात घुसखोरी केली होती.
नवी दिल्ली : चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. यावेळेस चिनी सैन्याने उत्तराखंडातील बाराहोतीमध्ये मागील आठवड्यात घुसखोरी केली होती.
५ जुलै सकाळी ९ वाजता चिनी सैन्याने घुसखोरी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे चिनी सैन्य सीमा ओलांडून थेट १ किलोमीटर आत शिरले होते.
मात्र अद्याप केंद्र सरकार किंवा सुरक्षा दलांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. चिनी सैन्याने घुसखोरी करताच इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्सच्या जवानांनी त्यांना जोरदार विरोध केला. यानंतर चिनी सैन्याने माघार घेतली.
भारत आणि चीनमध्ये डोक्लाम प्रश्नावरुन प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर चिनी सैन्याने भारतात घुसखोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
चिनी सैन्याने सीमारेषा ओलांडून जवळपास १ किलोमीटर अंतरापर्यंत घुसखोरी केली. चिनी सैन्याने २५ जुलै रोजी उत्तराखंडातील बाराहोती भागातील सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.
लडाख आणि सिक्कीममध्ये चिनी सैनिकांनी अनेकदा घुसखोरी केली आहे. बाराहोतीमध्येही याआधी चीनकडून घुसखोरी करण्यात आली आहे.
भारत आणि चीनमध्ये बाराहोती सीमेवरुन कोणाताही वाद नाही. त्यामुळेच अशा प्रकारची घुसखोरी पुन्हा सहन केली जाणार नाही, असा इशारा भारताकडून देण्यात आला आहे.