नवी दिल्ली : सिक्किममधल्या डोकलाममधून भारतीय सैन्यानं तात्काळ माघार घ्यावी, तरच कुठलीही राजकीय चर्चा पुढे जाऊ शकते असं धमकी वजा स्पष्टीकरण भारतातल्या चीनच्या राजकीय दूतांनी दिलं आहे.


डोकलामचा परिसर सार्वभौम देशाचा हिस्सा आहे. त्यात भारतीय सैन्यांनं घुसणं योग्य नाही....भारतीय सैनिकांनी तात्काळ आपल्या हद्दीत माघार घेणंच अशा वेळी योग्य आहे. तरच चर्चेला काही तरी अर्थ आहे असंही चीननं स्पष्ट केलं आहे.