नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या नेपाळमध्ये आहेत. राहुल गांधी हे चायनीज डिप्लोमॅट Hou Yanqi सोबत होते असा दावा सोशल मीडियावर होत आहे. काठमांडूच्या एका पबमधील राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांच्या सोबत असलेली ही महिला चीनची राजदूत Hou Yanqi आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी ट्विट करत असा दावा केला आहे.


राहुल गांधी नेपाळमध्ये त्यांची मैत्रीण सुमनिमा उदास (Sumnima Udas) हिच्या लग्नासाठी गेले आहेत. या दरम्यान त्यांचा एका पबमधला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत एक तरुणी दिसत आहे. लोकांनी दावा केलाय की, ही तरुणी नेपाळमध्ये चीनची राजदूत Hou Yanqi आहे. य़ानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलंच ट्विटरवॉर रंगला.


राहुल गांधी हे 2 मे रोजी 5 ते 6 लोकांसोबत पबमध्ये आले होते. पण ही महिला चीनी राजदूत नसून सुमनिमा उदासची मैत्रीण आहे. असं सांगण्यात येत आहे.


राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ व्हायरल पुढे आल्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं की, 'राहुल गांधी हे काठमांडूला त्यांच्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी गेले आहेत आणि तो त्यांचा खाजगी दौरा आहे.'