Chinese Apps Ban: भारताचा चीनला मोठा धक्का! `या` अॅप्सवर घातली बंदी, हे आहे कारण
Chinese Apps Ban in India : भारत चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. कारणभारताने 232 चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाच्या सूचनेवरून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बंदीची प्रक्रिया सुरू केली आहे.
Chinese Apps Ban: सीमेवरील भारत (India) आणि चीन (China) यांच्यातील संघर्ष सर्वज्ञात आहे. भारतीय बाजारपेठेत चीनचा मोठा वाटा आहे. मात्र आता भारत चीनला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच आता कर्ज आणि सट्टेबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या चीनशी संबंधित अनेक अॅप्सवर भारत सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने (MeIT) माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 अंतर्गत या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे अॅप्स चीनी कंपनी Tencent, Alibaba यांच्याशी संबंधित आहे. रिपोर्टनुसार, हे अॅप्स भारतीयांचा डेटा चीन सारख्या देशात असलेल्या सर्व्हरवर ट्रान्सफर करत होते.
वाचा : भारतीय क्रिकेटपटूच्या विरोधात पत्नीची तक्रार, दारूच्या नशेत कुकिंग पॅनने मारहाण
याचपार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून या अॅप्सना ब्लॉक करण्याचे निर्देश या आठवड्यात मिळाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं 6 महिन्यांपूर्वी चिनी कर्ज देणाऱ्या 28 अॅप्सची चौकशी सुरू केली होती. तपासात असं आढळून आलं की, असे 94 अॅप्स ई-स्टोअरवर आहेत आणि इतर कोणत्याही थर्ड पार्टी लिंकद्वारे काम करत आहेत. लोकांना मोठ्या प्रमाणावर कर्जात अडकवण्यासाठी अनेकदा सापळे लावणाऱ्या या अॅप्सचा हेरगिरी आणि प्रचाराची साधने म्हणूनही गैरवापर केला जाऊ शकतो.
परिणामी मोदी सरकारने138 सट्टेबाजी आणि 94 लोन अॅप्सवर तात्काळ आणि आपत्कालीन आधारावर बंदी घालणार आहे. या अॅप्समध्ये भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला हानी पोहोचवणाऱ्या सामग्रीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, या अॅप्समुळे भारतीय नागरिकांच्या डेटाची सुरक्षाही धोक्यात येऊ शकते. तेलंगणा, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी तसेच केंद्रीय गुप्तचर संस्थांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला या अॅप्सवर कारवाई करण्यास सांगितलं होतं.
तसेच जून 2020 मध्ये भारत सरकारने 200 पेक्षा अधिक चीनी अॅप्सवर निर्बंध घातले होते. सरकारने पहिल्या टप्प्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community सारख्या लोकप्रिय अॅप्सवर बंदी घातली होती.