नवी दिल्ली : डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. अशात या मुद्द्यावरुन चीन भारताला सतत धमक्या देत आहे. मात्र भारताला धमक्या देणारा चीन रशियात भारतासमोर तोंडावर पडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियामध्ये सुरू असलेल्या एका जबरदस्त स्पर्धेत चीनचे टँक भारतीय टँकसमोर निकामी ठरले आहेत. रशियातील या आर्मी गेममध्ये सर्वच देशातील टँकची स्पर्धा झाली. यात भारतानेही सहभाग घेतला होता. 


भारतीय सेना या स्पर्धेच्या दुस-या राऊंडमध्ये पोहोचली आहे. पहिल्याच राऊंडमध्ये रशियाने बाजी मारली होती आणि भारत चौथ्या क्रमांकावर आला होता. या स्पर्धेत चीनच्या टँकनेही सहभाग घेतला होता. मात्र चीनी टँक निकामी ठरले. या टँकचे अनेक भाग वेगवेगळे झाले. 



या स्पर्धेचा पहिला राऊंड संपला असून आता पुढील दोन किंवा तीन दिवस दुस-या राऊंडचा मुकाबला होईल. या राऊंडमध्ये टँकसोबतच शस्त्रास्त्र चालवण्याचेही खेळ होतील. दुस-या राऊंडमध्ये १० ऑगस्टला भारताचा मुकाबला होईल. दुस-या राऊंडमध्ये ४८ किलोमीटरची रिले रेस होईल, ज्यात एकच टँक असेल आणि त्याद्वारेच कर्तब दाखवले जातील. पहिल्या राऊंडमध्ये भारताच्या भीष्मा टँकने कसे प्रदर्शन केले, याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 
  
दुस-या राऊंडमध्ये पहिल्या चार क्रमांकावर राहणा-या टॉप ४ टीम पुढील राऊंडमध्ये जातील. फायनल रेस १२ ऑगस्टला होईल. यावर्षी या स्पर्धेत १९ देशांनी सहभाग घेतला आहे. ज्यात भारत, रशिया कझाकिस्तान देशांचाही समावेश आहे.