भारतीय लष्कराच्या कणखरपणापुढे चीन झुकला, अशी घेतली माघार !
भारतानेही आपली सैनिकांची संख्या कमी करायला सुरूवात केली
नवी दिल्ली : अखेर भारतीय लष्कराच्या कणखरपणा आणि दमदार परराष्ट्रनीतीसमोर चीन झुकला. पूर्व लडाखमध्ये चिनी सैन्याने पँगाँग भागात फिंगर 4 पर्यंत माघार घेतलीय. सैन्य माघारीसोबतच केलेलं बांधकामही चीनने हटवलंय. फिंगर ५ आणि ६ दरम्यान चीनने लेकमध्ये बोटींसाठी केलेले प्लॅटफॉर्मही हटवलेत.
चीनने अपेक्षित माघार घेतल्यावर आता भारतानेही आपली सैनिकांची संख्या कमी करायला सुरूवात केलीय. जिथे चिनी आणि भारतीय सैनिक आमनेसामने होते तिथली संख्याही कमी करण्यात येत आहे.
पँगाँग लेक भागातल्या दक्षिण किनाऱ्यावरचे रणगाडेही भारताने मागे घेतलेत. दक्षिण किनाऱ्यावर दोन्ही देशांच्या रणगाड्यांमध्ये अवघं 100 मीटरचं अंतर राहिलं होतं. आता दोन्ही देशांचे रणगाडे काही किलोमीटर मागे गेलेत.