स्वर्गसुखाचा आनंद देतोय भारतातला हा `मिनी नायगरा`
तुम्हाला भारतातला नायगरा धबधबा माहिती आहे का?
बस्तर : जगातला सर्वात मोठा धबधबा म्हणून नायगरा धबधब्याची ओळख आहे. पण तुम्हाला भारतातला नायगरा धबधबा माहिती आहे का? छत्तीसगड जिल्ह्यातल्या बस्तरमध्ये चित्रकुट धबधबा आहे. हा धबधबा तुम्हाला नायगरा धबधब्याची आठवण करून देतो.
जगातला सर्वात मोठा धबधबा म्हणून नायगरा धबधब्याची ओळख आहे. अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर असलेल्या नायगरा धबधब्याला भेट देणं सगळ्यांनाच शक्य होणार नाही. पण आपल्या देशात नायगरा धबधब्याच्या तोडीचा धबधबा आहे. तुम्हाला नायगरा धबधब्याची अनुभूती घ्यायची असेल तर एकदा तरी चित्रकुटला भेट द्यायलाच हवी...
इंद्रावती नदी छत्तीसगडच्या बस्तरमधील चित्रकूटजवळ, जवळपास नव्वद फुटांवरून खाली कोसळते. इंद्रावती दुधडी भरून वाहते तेव्हा मातकट रंगाचं पाणी उंचावरून वेगानं धबधब्यात कोसळताना पाहणं ही मोठी पर्वणी असते. नऊशे फूट रुंदींच्या या धबधब्याचा परिसर तुषारांनी भारून गेलेला असतो. पावसाळ्यात हा मिनी नायगरा पाहण्यासाठी देशभरातून लोकं चित्रकूटला येतात.
हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांसाठी खास गॅलरी बनवण्यात आली आहे. हा धबधबा म्हणजे मिनी नायगराच आहे. त्यामुळं ज्यांना अमेरिकेला जाऊन नायगरा पाहता येणार नाही त्यांनी चित्रकूटला जाऊन मिनी नायगरा नक्कीच पाहायला हवा.