सोनं-चांदी, रोकड बाजूला ठेवत चोरट्यांचा चॉकलेटवर डल्ला; खास कारणासाठी केली `ही` विचित्र चोरी
आजपर्यंत आपण सोने, चांद, पैसे किंवा मौल्यवान हिरे चोरीला गेल्याच्या घटना पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. पण लखनऊ येथील चिन्हाटमध्ये देवराजी बिहार परिसरातून एक अनोखी चोरीची घटना घडली आहे.
Uttar Pradesh : आजपर्यंत आपण सोने, चांद, पैसे किंवा मौल्यवान हिरे चोरीला गेल्याच्या घटना पाहिल्या आणि ऐकल्या आहेत. पण लखनऊ येथील चिन्हाटमध्ये देवराजी बिहार परिसरातून एक अनोखी चोरीची घटना घडली आहे. घरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्याने पैसे आणि इतर वस्तूंवर डाका न टाकता तब्बल 20 लाखांची चॉकलेटं घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. ही सगळी चॉकलेटं 150 खोक्यांमध्ये ठेवलेली होती. ही सगळी खोकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नेमकं घडलं आहे?
लखनौच्या चिनहाट परिसरातील राजेंद्रसिंग सिद्धू हे एका बहुराष्ट्रीय कंपनीची चॉकलेटं वितरीत करण्याचा व्यवसाय करतात. ते नुकतेच लखनौच्या चिनहाट परिसरातील त्यांच्या जुन्या घरातून गोमती नगरमधील नवीन घरी राहायला गेले होते. चिनहाटमधील जुन्या घराचा वापर चॉकलेटं ठेवण्यासाठी गोदाम म्हणून ते करत होते. मंगळवारी राजेंद्रसिंग सिद्धू यांना त्यांच्या जुन्या घराच्या शेजाऱ्यांचा फोन आला. त्यांच्या घराचं कुलूप तोडण्यात आल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. राजेंद्रसिंग जेव्हा घरी पोहोचले, तेव्हा आख्खं घर रिकामं असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर देखील चोरून नेल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.
रात्रीच्या सुमारास इमारतीच्या खालून मोठ्या पिकअप ट्रकचा आवाज आल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. त्यातूनच चॉकलेटची ही 150 खोकी चोरांनी नेली असतील, असा संशय राजेंद्रसिंग सिद्धू यांनी व्यक्त केला आहे. दोनच दिवसांपूर्वी हा सगळा माल शहरात वितरीत करण्यासाठी आला होता, असं देखील राजेंद्रसिंग यांनी सांगितलं आहे.