मुंबई : डिसेंबर महिन्याच्या शेवटाला ख्रिसमसचे वेध लागतात. आपल्या प्रत्येकाकडे सांताक्लॉज आणि त्याच्या गिफ्टची आठवण आहे. दरवर्षी ख्रिसमस म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो पांढरी दाढी आणि पांढरे केस आणि हा सांता लाल रंगाचे ड्रेस परिधान करतो. हातात मोठी बॅग आणि त्या बॅगेत खूप सारे गिफ्ट्स.... लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच सांताक्लॉजची क्रेझ आहे. पण हा सांता खरा कोण? तो नेमका कसा दिसतो? आणि त्याच्या गिफ्ट्स देण्या मागची कथा? तुम्हाला माहित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


खरा सांताक्लॉज कोण? 


पांढऱ्या केसांचा, पांढऱ्या दाढीचा... लाल कपडे परिधान करणाऱ्या सांताक्लॉजचं खरं नाव सेंट निकोलस. सेंट निकोलस यांचा जन्म तिसऱ्या शतकात उत्तर ध्रुवावर स्थित मायरा येथील एका श्रीमंत कुटुंबात झाला होता. या संत निकोलस यांनाच खरा सांता म्हणतात.


ते लहान असताना अनाथ होते. त्यानंतर, येशूवर त्याचा विश्वास वाढत गेला आणि त्यांनी स्वतःचे पालक म्हणून येशूचा स्वीकार केला. पुढे संत निकोलस मोठा झाल्यावर ख्रिस्ती धर्माचा धर्मगुरू बनला.



निकोलस यांचा दयाळूपणा 


सेंट निकोलस यांच्या उदारपणाची एक अतिशय प्रसिद्ध कहाणी आहे. निकोलस यांना मदत करण्याचा छंद होता. ते कायमच गरिबांना मदत करतं. एका त्यांनी एका गरीब माणसाला मदत केली होती. ज्याच्याकडे त्याच्या तीन मुलींचे लग्न करण्यास पैसे नव्हते. 


त्यावेळी, संत निकोलसने छुप्या पद्धतीने त्या तीन मुलींच्या मोज्यांमध्ये सोन्याच्या नाण्यांची पिशवी ठेवली आणि त्यांना या समस्येतून सुखरूप सोडवले. तेव्हापासून, ख्रिसमसच्या रात्री भेटवस्तू मिळण्याच्या आशेने लहान मुले घराबाहेर किंवा खिडकीत मोजे टांगतात.



गिफ्ट्स देण्याची पद्धत अशी झाली रूढ 


गरीबांना मदत करण्यासाठी सेंट निकोलसने वारंवार अशा प्रकारे पैसे ठेवले आणि एकदा त्या माणसाने हे पाहिले. जरी सेंट निकोलसने त्याला हे कोणालाही सांगण्यास मनाई केली. परंतु ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली. तेव्हापासून लोकांनी एकमेकांना मोजे लपवून भेटवस्तू देण्यास सुरुवात केली. 


तेव्हापासून सांताक्लॉजच्या नावाने भेटवस्तू वाटण्याची प्रथा सेंट निकोलसच्या नावाने सुरू झाली आणि जगभरातील लोक या उत्सवाच्या निमित्ताने भेटवस्तूंचे वाटप करू लागले.