पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार, ६ नागरिकांचा मृत्यू
रमजानच्या महिन्यात भारतीय सीमा रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच आहे. या गोळीबारात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झालाय.
नवी दिल्ली : रमजानच्या महिन्यात भारतीय सीमा रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरुच आहे. या गोळीबारात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिलाय. भारतीय जवान पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख उत्तर देतील. बुधवारी पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार करण्यात आलाय. जम्मूतील आरएसपुरा, रामगढ आणि अरनिया सेक्टरमध्ये सीमेवर गोळीबार झाला. यात ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तसेच एक एसपीओसह ६ जण जखमी झालेत. भारतने याला चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानचा सैनिक मारला.
सीमेवर ९ व्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू कश्मीरमधील हीरानगर, सांबा, अरनिया आणि आरएस पुरामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय. गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलेय, गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांना काय करायचे आहे ते माहित आहे. आम्ही गोळीबाराला योग्यवेळी उत्तर देऊ. जवान जी कारवाई करतील, त्यांना कोणीही काहीही विचार नाही. पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती काढण्यात येत आहेत.
भारताकडून गोळीबाराला चोख उत्तर दिल्यानंतर पाकिस्तान घाबरला. त्यांनी भारतीय प्रत्युत्तर रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आलेले नाही. मात्र, रात्री पुन्हा पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात दोन जवान शहीद झालेत. तर ४ नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत असल्याने आरएसपुरा आणि अरनिया येथून ५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जानेवारीत ३८ लोकांचा मृत्यू झालाय. यात १९ सुरक्षा कर्मचारी आहेत.