Crime News In Marathi: इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मंगळवारी ही घटना घडली असून कोलकत्ता येथील ही तरुणी आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या मृतदेहाशेजारीच तिची बाहुलीलाही गळफास लावलेल्या स्थितीत होती. ही बाहुली सतत तिच्यासोबत असायची तीदेखील गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

13 वर्षांच्या चिमुकलीने गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आणखी दोन बाहुल्यांच्या भोवती गळफास तयार करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळला असून फक्त एकाच बाहुलीच्या गळ्याभोवती फास आवळला होता. मात्र, चिमुकलीचा अशा प्रकारचा मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी हुशार विद्यार्थी होती. कोलकत्तातील नामांकित शाळेत ती शिकत होती. तिचे वडिल ई-रिक्क्षा चालक होते तर आई गृहिणी होती. तर, मृत मुलीला एक मोठी बहिण देखील होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलीचा मृत्यू हा आत्महत्येमुळंच झाला आहे. तिच्या मृत्यूचे कारण हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. 


पोलिसांनी म्हटलं आहे की, आत्तापर्यंत आम्हाला काहीच संशयास्पद आढळलेले नाहीये. मुलीने टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास आम्ही करत आहोत. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीने तिच्याच राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री तिच्या घरचे घराशेजारीच असलेल्या लक्ष्मी पूजेसाठी निघाले होते. तिची बहिणही आई-वडिलांसोबत निघाली होती. मात्र, मुलीने सोबत जायला नकार दिला होता. परीक्षा असल्यामुळं खूप आभ्यास बाकी आहे , असं सांगून तिने नकार दिला होता व घरीच थांबली होती. 


मुलीचे आई-बाबा तिच्या बहिणीसोबत निघून गेले होते. मात्री रात्री 9.30च्या दरम्यान ते घरी आल्यानंतर कितीतरी वेळ दरवाजा वाजवत होते. मात्र, तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. शेवटी घराचा दरवाजा तोडून त्यांनी आत जाताच पाहिले तर मुलीने गळफास घेत आत्महत्या केली होती. कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना बोलवले त्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


मुलीने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोटही सापडली नाहीये. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचे कारण कळू शकणार आहे.