Cleaning Tricks: दररोज आपण घरातील स्वच्छता तर करतोच पण बऱ्याचदा काही ठिकाणी स्वच्छता करताना नाकी नऊ येतात,त्यातलाच महत्वाचं ठिकाण म्हणजे घरातील देवघर. देवघर साफ करताना खूप कष्ट करावे ;लागतात कारण देवघरातील देवांच्या मुर्त्यांवर एक थर चढलेला असतो जो सहजासहजी साफ होत नाही कितीही जोर लावून स्वच्छ केलं तरी मुर्त्यावरचे  (God idol cleaning hacks) डाग काढणं मुश्किल होऊन बसतं . देवघरातील मूर्तीच काय देवघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या साफ कारण कठीण होत . पण आता याच टेन्शन घ्यायची गरजच नाहीये काही सोप्या स्मार्ट किचन टिप्स वापरून तुम्ही यावर उपाय मिळवू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे चमकवा मंदिर 


जर तुमचे मंदिर लाकडाचे असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण वापरा, असे केल्याने लाकूड चमकते. पण जर तुमचे मंदिर संगमरवरी दगडाचे म्हणजे मार्बलचे असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी पाण्यात सोडा मिसळून ते स्वच्छ करा. (how to clean mandir at home)


देवाच्या मूर्तींची स्वच्छता


बऱ्याचदा देवांच्या मूर्ती लवकर काळ्या पडतात किंवा त्यावर विशिष्ट थर  जमा होतो  आणि कितीही साफ केल्या तरी स्वच्छ होत नाहीत. देवाच्या मूर्तींवर साचलेली धूळ साफ करण्यासाठी स्वच्छ पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि लिंबाच्या सालीने पुसून मूर्ती स्वच्छ करा.


मंदिरातील भांडी साफ करणे


सर्व प्रथम, मंदिरात ठेवलेली पितळ आणि तांब्याची भांडी 30 मिनिटे  गरम पाण्यात भिजवत ठेवा. यांनतर लिंबाची फोड घ्या त्यावर मीठ घाला आणि त्याने भांडी घासा. तुम्ही लिंबू आणि सोडा एकत्र करून देखील स्वच्छ करू शकता.  


मंदिरातील कपडे कसे स्वच्छ कराल


मंदिराच्या कपड्यांवर बऱ्याचदा तेलाचे डाग पडतात  आणि ते स्वच्छ करून कठीण होऊन बसत. अशावेळी काय करावं हे समजत नाही , यावर एक उपाय आहे जो आजमावून तुम्ही स्वच्छ करू शकता,


लिंबू आणि व्हिनेगर एकत्र करून तुम्ही देवघरातील कपडे स्वच्छ करू शकता.  गरम पाण्यात व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळा आणि  देवघरातील डाग पडलेलं कापड या पाण्यात 30 मिनिटे  भिजवा आणि मग स्वच्छ घासून घ्या.