धर्मशाला : देशात पावसाचा कहर सुरु आहे.  (Heavy rains in Himachal’s Dharamshala) हिमाचल प्रदेशातील धरमशालामध्ये (Dharamshala) पूर (flood) आल्याने या पुरात गाड्या वाहून गेल्या आहेत.  सिमल्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग बंद असून तर जम्मू-काश्मीरमध्येही तुफान पाऊस आहे. पावसाचा पर्यटकांना मोठा फटका बसला आहे. (Heavy rains cause flash flood in Himachal’s Dharamshala)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाला आहे. मागील दोन तीन दिवसांपासून उत्तर भारतात अनेक ठिकाणी पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. यानंतर आज हिमाचल प्रदेशातील धर्मशाला याठिकाणी पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळाले. ढगफुटी (cloudburst) झाल्याने धर्मशाला येथील भागसू याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे वाहनासह घराचे मोठे नुकसान झाले आहे. 



पर्यटकांच्या कार पाण्यासोबत वाहून गेल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात (Social media) व्हायरल (Viral video) होत आहे. 



हिमाचल प्रदेशात भागसू हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.याठिकाणी हजारोंच्या संख्येनं पर्यटक येत असतात. अशात ही ढगफुटी झाल्याने अनेक पर्यटक घटनास्थळी अडकून पडले आहेत. ढगफुटीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात अनेक पर्यटकांच्या महागड्या गाड्या वाहून गेल्या आहे.