नवी दिल्ली : शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी शेतकरी कर्जमाफीवर आज सकाळीच एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्लेखनीय म्हणजे, बैठक संपल्यावरही पाऊण तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात गुफ्तगु झाली. या चर्चेत नेमके काय झाले? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, शेतकरी आंदोलनावरून भाजप सरकार अडचणीत आले असताना शरद पवारांचं मन वळवून कर्जमाफीचा मुद्दा तडीस लावण्यावर भाजप भर देत असल्याचे कळतं. 


दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अजित पवार मात्र बैठकीला हजर नव्हते...
 

दरम्यान या बैठकीमध्ये नेमकं काय झालं याबाबतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिलीय. राजकीय नेत्यांसोबत मॅरेथॉन बैठका घेऊन कर्जमाफीवर तोडगा काढण्यात येत असल्याचं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. या संदर्भात आज रात्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलंय. शरद पवार यांनी काही सूचना केल्या आहेत. त्याचाही विचार करण्यात येणार आहे. शिवाय कर्जमाफीसाठी एकूण ३८ हजार कोटी रुपये खर्च होणार असून १ लाखांपर्यंतची सर्व कर्ज माफ होतील, असंही राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.