मुंबई :  देशाच्या बजेटमध्ये मुंबईसाठी 55 हजार कोटी मिळणे ही ऐतिहासिक बाब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवभारताचे स्वप्न दाखवले आणि ते पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी म्हटले.  परेल उपनगरीय टर्मिनसचे उदघाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राच्या बाबतीत जितक्या मागण्या पाठवल्या पियुष गोयल यांनी पूर्ण केल्याचेही ते म्हणाले. मुंबईत विविध प्रकल्पांचा शुभारंभ आज होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनांचे उद्घाटन होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आपण केंद्र सरकारकडे मागताना काही गोष्टी जास्तच मागतो पण ट्रेन सुरू होण्याच्या जितक्या मागण्या केल्या त्या रेल्वे मंत्र्यांनी पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नवभारताच्या मोदीजींच्या संकल्पनेत वेगवान विकास आहे. मुंबईकरता मोदींचे काम हे अतुलनीय असल्याचेही ते म्हणाले. आज आम्ही मेट्रो करतोय तसेच मोनोच्या उद्घाटनाला चाललोय. आता मोनो केवळ जॉय राईड राहणार नाही तर मुंबई जोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका करणार आहे. वर्षानुवर्षे मुंबईतील रेल्वेत ज्यांनी धक्के खाल्ले त्यांना मोनोच्या बातमीने सुखद धक्का मिळणार आहे. 



भाजपाचे सरकार आल्यावर जे प्रकल्प आम्ही समोर आणले ते पूर्ण झाले. धारावीचा प्रकल्प या सर्वात मागे राहिला होता तो देखील पूर्ण होत असल्याचे समाधान आज होत आहे. धारावीच्या पुनरवसनाचे काम हा महत्वाचा प्रश्न होता. 50 हजार जणांचे पुनरवसन करणे हे आव्हान होते. रेल्वेने जर धारावी वासियांना जागा द्यायचे मान्य केल्याने त्या कामाला देखील वेग मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.