पर्रिकर गोव्यात परतले, आज अर्थसंकल्प सादर करणार
मनोहर पर्रिकर यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते गोवा राज्याच्या अर्थसंकल्पात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबई : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात परतले आहेत, मनोहर पर्रिकर यांच्यावर मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. मनोहर पर्रिकर यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर ते गोवा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.
मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर
मनोहर पर्रिकर यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार गरज पडल्यास पर्रिकर पुन्हा लीलावतीला जाऊ शकतात, मात्र पर्रिकर यांची प्रकृती आता खूप चांगली आहे.
लीलावतीत घेत आहे पर्ऱिकर उपचार
मनोहर पर्रिकर यांची अचानक तब्येत बिघडली, त्यांच्या पोटात दुखू लागल्याने, त्यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोहर पर्रिकर यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याचं सांगण्यात येत आहे.