Medicine From The Sky : आता तुम्हाला औषध विकत घेण्यासाठी मेडिकल स्टोअरला जाण्याची गरज पडणार नाही. कारण, आता देशामध्ये 'आसमान से दवा' ही सेवा सरु होणार आहे. या सेवेच्या माध्यमातून ड्रोनचा वापर करुन औषधे पोहोचवली जातील. अरुणाचल प्रदेशमध्ये या पायलट प्रोजेक्टला सुरुवात झाली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्वीट करुन याची माहिती दिली आहे. पेमा खांडूंनी सांगितलं की, राज्यामध्ये सोमवारी 'आसमान से दवा' (Medicine From The Sky) ची पहिली गगण भरारी ड्रोनच्या माध्यमातून यशस्वीरित्या झाली आहे.



ट्वीटच्या माध्यमातून व्हिडिओ जारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी असं सांगितलं की, ड्रोन सर्विसने पूर्व कामेंग जिल्ह्याच्या (East Kameng District) सेप्पा (Seppa) ते च्यांग ताजो (Chayang Tajo) पर्यंत यशस्वीपणे भरारी घेतली आहे.



पीएम मोदींच व्हिजन



मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्वीट करुन सांगितलंय की, अरुणाचल प्रदेशमध्ये ड्रोन सेवा सुरु केली आहे. भारताला ड्रोन हब बनवण्याच्या ड्रोन पॉलिसीअंतर्गत अरुणाचल प्रदेशमध्ये ही सेवा सुरु केली आहे.


यासाठी राज्य सरकारला जागतिक आर्थिक मंचची (World Economic Forum) मदत मिळाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या व्हिजननुसार राज्य सरकारने आरोग्य, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी ड्रोनचा वापर करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.


स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सेवा सुरु 



मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्वीट करुन सांगितलं की, फील्ड असेसमेंट रिपोर्टनुसार, 'मेडिसिन फ्रॉम द स्काय'चा एक पायलट प्रोजेक्ट आज अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यात सुरु झाला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या प्रोजेक्टला व्हर्चूअल लाँच केलं आहे. 



बंगळूरुचं स्टार्टअप



अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी ट्वीट करुन सांगितलं की, युनायटेड स्टेट एजेंसी फॉर इंटरनेशनल डेव्हलपमेंटकडून (USAID) फंड मिळाला आहे. बंगळूरच्या स्टर्टअप रेडविंग लॅब्सने (Redwing Labs) याची अंमलबजावनी केली आहे.