भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विजयाची जबाबदारी यंदा महाराष्ट्राच्या लेकीवर आहे. कारण शिवराजसिंह चौहानांनी बुधनी मतदारसंघ सोडून अन्य 229 मतदार संघांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी साधना सिंह चौहानांवर बुधनीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आहे. साधना या म्हाराष्ट्रातल्या गोंदिया जिल्ह्यातल्या आहेत. 26 वर्षांपूर्वी त्या शिवराजसिंह यांच्याशी लग्न केलं आणि त्या 'मध्य प्रदेश की बहु' झाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीसाठी काही दिवस बाकी आहेत. अशातच सगळे राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोर लावत आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शाह प्रचारात उतरले आहेत. तर काँग्रेसचे दिग्गज नेते देखील मैदानात आहेत. मध्य प्रदेशात एकूण 230 जागांवर निवडणूक होणार आहेत. 28 नोव्हेंबरला येथे मतदान होणार आहे तर 11 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. भाजप आणि काँग्रेसमध्ये येथे चुरस आहे.


शिवराज सिंह गेल्या 15 वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. भाजपने निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व आमदारांना बोलवले आहेत.