लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यावर लांगुलचालन राजकारणाचा आरोप लावला आहे. प्रियंका गांधींनी काल योगी आदित्यनाथांवर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती.' भगवा रंग धारण केलेल्यांना भगव्या रंगांच महत्व समजलं पाहिजे इतकचं नाही तर, भगवा रंग आपल्या परंपरेचं प्रतिक आहे. तिथे कोणत्याही हिंसाचाराला स्थान नसल्याचं.'वक्तव्य केलं होतं. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी-वाड्रा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात सध्या वॉर सुरु आहे. सोमवारी लखनऊमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री य़ोगी यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. यावर भाजपने जेव्हा प्रियंका गांधांना उत्तर दिलं त्यानंतर सोमवारी रात्री प्रियंका गांधी यांनी दुर्गा सप्तशतीचा एक मंत्र ट्विट केला. 



सीएए विरोधात झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान हिंसा उसळली होती. त्यानंतर योगी सरकारने हिंसा करणाऱ्यांकडूनच नुकसान भरपाई घेण्याचे आदेश दिले होते. यावर प्रियंका गांधी यांनी टीका केली होती. प्रियंका यांनी यूपी पोलीस आणि सरकारवर अराजकता पसरवत असल्याचा आरोप केला होता.


उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी प्रियंका यांच्याकडून भगव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला होता. उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की, कोणत्याही निर्दोष व्यक्तीच्या विरोधात कारवाई नाही झाली. प्रियंका गांधी या हिंसेखोर लोकांना पाठिशी घालत चर्चेत राहण्यासाठी असे आरोप करत आहेत.