मुंबई : फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं फेसबूक पेजला इतर मुख्यमंत्र्यांच्या फेसबूक पेजपेक्षा जास्त चर्चेत राहिलं. फेसबूकनंच ही माहिती दिली आहे. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सगळ्यात वरती राहिले.


योगींचे ५४ लाख फॉलोअर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबूकनं केलेल्या सर्वेक्षणानुसार सगळ्या मुख्यमंत्र्यांना आलेल्या रिएक्शन, पोस्टच्या शेअर आणि त्यावर आलेल्या कमेंटना आधार मानण्यात आलं. एका वर्षामध्ये योगींच्या फेसबूक पेजचे ५४ लाख फॉलोअर्स झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या यादीमध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आहेत. 


राज्यसभा सदस्य सचिन तेंडुलकर सगळ्यात वरती


१ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत राज्यसभा सदस्यांमध्ये सचिन तेंडुलकर सगळ्यात लोकप्रिय फेसबूक पेज होतं. सचिनच्या पेजला २.८ कोटी लाईक मिळाले होते. सचिननंतर आर.के सिन्हा आणि अमित शहांचं नाव आहे. तर लोकसभा सदस्य आणि कॅबिनेट मंत्र्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं फेसबूक पेज सगळ्यात पुढे आहे. मोदींच्या पेजला ४.२ कोटी लाईक मिळाले आहेत. मोदींनंतर ओवेसी यांचा क्रमांक लागतो. तिसऱ्या क्रमांकावर भगवंत मान आहेत.


भाजपचं पेज सगळ्यात लोकप्रिय


फेसबूकनं सगळ्यात लोकप्रिय फेसबूक पेजच्या यादीमध्ये राजकीय पक्षांचाही समावेश केला आहे. यामध्ये भाजपचं पेज पहिल्या क्रमांकावर राहिलं. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आप आणि तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचं पेज आहे.