नवी दिल्ली : उत्‍तर प्रदेशच्या पालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योगींनी पंतप्रधान मोदींना पुष्पगुच्छ आणि एक भेटवस्तू देखील दिली. पंतप्रधान मोदींनी विजयाबद्दल योगींनी शुभेच्छा देखील दिल्या.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर योगींच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास साफ दिसत होता. यूपी नगरपालिका निवडणुकीत १६ पैकी १४ जागांवर भाजपचा महापौर होणार आहे. तर २ जागांवर बसपाचा महापौर असणार आहे. 


समाजवादी पक्ष आणि काँग्रेसचं खातं देखील उघडू शकलं नाही. नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. भाजपनंतर सर्वाधिक जागा सपाने जिंकल्या आहेत. तर बसपा तिसऱ्या क्रमांकावर आहे. 


सगळ्यात शेवटी काँग्रेसचा क्रमांक आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघात देखील काँग्रेसला झटका लागला आहे. अपक्ष उमेदवारांनी देखील मोठ्या प्रमाणात बाजी मारली आहे.