मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत झालेल्या वाढीदरम्यान, सीएनजीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सर्व सामान्य जनतेला बसणार आहे. सीएनजीच्या दरात 2.50 रूपयांनी वाढ झाली आहे, तर पीएनजीच्या दरात 1.50 रूपयांनी  वाढ झाली आहे. महत्त्वाचं  म्हणजे वर्षभरात सीएनजी आणि पीएनजी जवळपास 18 रूपयांनी महागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या दरवाढीमुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना मोठा फटका बसणार आहे. शिवाय रिक्षा, टॅक्सी, बसेसना झालेल्य दरवाढीचा फटका बसणार आहे. तर आता नव्या दरानुसार सीएनजी 66 रूपये किलो तर पीएनजी 40 रूपये किलो होणार आहे. 


पीएनजी म्हणजे घरी येणाऱ्या पाईप गॅसचे दर देखील वाढले आहेत. इंधनांच्या दरांत सतत होणारी दरवाढ पाहाता सर्वसामान्यांच्या खिश्याला नव्या वर्षात कात्री बसणार आहे. तर गृहिणींच आर्थिक गणिक चुकेल.