मुंबई : सर्वसामान्य लोकांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. देशात सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दिल्ली एनसीआरमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरानंतर आता सीएनजीच्या दरामध्येही वाढ झाली आहे. गाजियाबादमध्ये 2.56 रुपये प्रति किलो तर दिल्लीत सीएनजी 2.28 रुपयांनी वाढले आहे. गेल्या 45 दिवसांमध्ये ही तिसऱ्यांदी झालेली वाढ आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ट्विट करून सीएऩजीच्या वाढत्या किंमतींबाबत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली - एनसीआरमध्ये CNG ची नवी किंमत
दिल्ली एनसीआरमध्ये सीएनजीच्या दरांमध्ये वाढ झाली असून ते 52.04 रुपयांवर पोहचले आहे. ग्रेटर नोएडामध्ये सीएनजीचे दर 58.58 रुपयांवर पोहचले आहेत. याआधी सीएनजीची किंमत 49.76  रुपये होती. सीएनजीच्या दरांत झालेल्या वाढीनंतर आता 52.04 रुपये मोजावे लागणार आहे.


45 दिवसात तिसऱ्यांदा वाढ
1 ऑक्टोबर रोजी इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने तिसऱ्यांदा सीएनजीचे दर वाढवले आहेत. याआधी मागील महिन्यात 1 आणि 13 ऑक्टोबरलादेखील दर वाढवण्यात आले होते. म्हणजेच सीएनजीमध्ये 45 दिवसात 15 टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. पेट्रोल डिझेल नंतर आता सर्वसामांन्याना सीएनजी देखील रडवणार आहे.


मुंबईत देखील वाढ
मुंबई मेट्रो परिसरात देखील सीएनजीच्या किंमती 2.27 रुपयांनी वाढल्या असून सध्या सीएनजी किंमत 57.54 रुपये इतकी आहे.