नवी दिल्ली: संपूर्ण वर्षभर काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीतर्फे अप्रायजल मिळेलच याची शाश्वती नसते. काही कंपन्यांमध्ये काम बघूनच पगारवाढ होते. पण अशीही एक कंपनी आहे जिथे वर्षाला नाही तर प्रत्येक महिन्याला पगारवाढ मिळते. ही कदाचित तुम्हाला मस्करीही वाटेल पण हे वास्तव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कंपनीचे नाव कोका-कोला इंडिया आहे. नव्या बदलानंतर कोका कोला इंडियाच्या व्यवस्थापकांवर वार्षिक कामगिरी पुनरावलोकन पूर्ण करण्यासाठी कोणतेही दबाव नसणार आहे.
कोका-कोला इंडियाने ग्लोबल व्हिजनशी ताळमेळ बसवत परफॉर्मन्स मॅनेजमेंट सिस्टीममध्ये बदल केला आहे. त्यामूळे कोका-कोला इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांना दरमहा अप्रायजल देत आहे.
द टाईम्स ऑफ इंडियात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, कोका-कोला कंपनीने मंथली फिडबॅक मॅकेनिजनसाठी हे बदल केले आहेत. कंपनीच्या कर्मचार्यांकडून कामात अधिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोका-कोला इंडिया आणि दक्षिण-पश्चिम आशियाचे व्हीपी-एचआर मनु नारंग वाधवा यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र करणे महत्त्वाचे आहे. त्यांनी सांगितले की फ्रेमवर्कमध्ये लवचिकता सर्वांना आपले सर्वोत्तम देण्यास सक्षम करते. 


नवीन प्रणाली कोका-कोला इंडियाच्या कॉर्पोरेट बिझिनेस युनिटमधील कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे. यामध्ये साधारण ३०० सहकारी संस्था आहेत.गेल्या ७ महिन्यांत सुमारे ८० ते ८५ मॅनेजर्सनी नव्या सिस्टीमला आत्मसात करत चांगला परफॉर्मन्स दिला आहे. प्रत्येक महिन्यात आपल्या कर्मचार्यांना त्यांच्या कामाचा अभिप्रायही दिला जात आहे.