मुंबई : भारतातील कॉलेजच्या विद्यार्थ्यांबद्दल एक धक्कादायक माहितीसमोर आली आहे. कॉलेज विद्यार्थी एका दिवसांत तब्बल 150 वेळा आपला फोन पाहतात अशी माहिती संशोधनात समोर आली आहे. अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालय आणि भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. शोधाचे शीर्षक  'स्मार्टफोन डिपेन्डेन्सी, हेडोनिज्म अॅण्ड पर्चज बिहेविअर : इंप्लिकेशन फॉर डिजिटल इंडिया इनीशिएटिव' असं देण्यात आलं आहे. 


विद्यार्थ्यांना असते ही भीती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचे संशोधन 20 महाविद्यालयात करण्यात आले. याकरता 200 विद्यार्थ्यांशी बातचीत करण्यात आली. मोहम्मद नावेद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये भीति असते की, ते काही गोष्टी विसरतील. किंवा काही गोष्टी त्यांना कळणार नाहीत. याकरता ते दिवसांतून 150 वेळा मोबाईल पाहतात. ज्यामुळे त्यांच स्वास्थ आणि शिक्षणावर वाईट परिणाम होतो. 


हे काम करतात विद्यार्थी 


त्यांनी असं सांगितलं की, या संशोधनादरम्यान 26 टक्के विद्यार्थी असे होते. ज्यांनी मोबाईलचा वापर फक्त बोलण्यासाठी केला जातो. तसेच इतर विद्यार्थ्यांनी आपल्या स्मार्टफोनचा वापर हा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहण्यासाठी किंवा काही गोष्टी शोधून काढण्यासाठी केला जातो असं सांगितलं.