Complaint For Not To Get Intoxicated After Consuming Liquor : लोकं नशेसाठी दारु पितात, पण दारुतच नशा नसेल तर ... मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये एका मद्यपीसोबत असाच एक किस्सा घडला आहे. दारु चढली नाही म्हणून मद्यपीने थेट राज्याच्या गृहमंत्र्यांनाच तक्रार केली आहे. एवढच नाही तर, त्याने उत्पादन शुल्क कार्यालयात दारुच्या दोन बाटल्याही पुरावा म्हणून दिल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्पादन शुल्क अधिकारीही हैराण - 


मद्यपीने दारुच्या बाटल्या पुरावा म्हणून दिल्यानंतर अधिकारीही हैराण झाला. दोन बाटल्या प्यायल्यानंतरही दारु चढत नसल्याचा आरोप मद्यपीने लावला. 'ही कोणत्या प्रकारची दारु आहे, जी चढत सुद्धा नाही'. दारु विक्रेत्याने भेसळयुक्त दारु विकल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करावी अशी त्याने मागणी केली आहे. 


मद्यपीची नेमकी मागणी काय?


लोकेंद्र सेठिया असं मद्यपीचं नाव असून 12 एप्रिल रोजी देसी दारुच्या दुकानातून दारु खरेदी केली. मात्र 2 बाटल्या पिऊनही दारु चढत नसल्याने मद्यपीने थेट उत्पादन शुल्क कार्यालय गाठलं. विक्रेत्याविरोधात कारवाई करावी अशी मद्यपीने मागणी केली . 



मला मद्यपींना न्याय द्यायचाय -


जे लोकं दारु पितात त्यांना न्याय मिळावा यासाठी माझी लढाई असल्याचे मद्यपीने सांगितले. मी स्वत: कमवतो आणि पितो सुद्धा पण जे लोकं फक्त पितात त्यांचं काय? त्यांना न्याय मिळायला हवा अशी माझी इच्छा, असं मद्यपी म्हणला. 


मद्यपीने तक्रारीत काय लिहिलं?


मी लोकेंद्र सेठिया आर्य समाज मार्ग बहादूरगंज येथील रहिवासी. 12 एप्रिल रोजी मित्रासोबत दारुच्या दुकानातून 4 क्वाटर देसी दारु विकत घेतली. मी आणि माझ्या मित्राने दोन बाटल्या प्यायल्यानंतर दारु नाही तर पाणी असल्याचे समजले. विरोध केल्यावर दारु विक्रेत्याने त्याच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने धमकवण्याचा प्रयत्न केलाय फसवणूक होत असल्यामुळे तक्रार दाखल करत असल्याचे मद्यपीने सांगितले.