31 December Deadline : वर्ष संपायला आता केवळ 10 दिवसांचा अवधी बाकी आहे. पण त्याचबरोबर काही कामांची डेडलाईनही संपणार आहे. जर तुम्ही ही कामं केली नसतील तर 31 डिसेंबरच्या आत ही कामं पूर्ण करुन घ्या. यात यूपीआई आयडीपासून (UPI ID) डिमॅट अकाऊंटपर्यंतच्या (DMat Account) कामांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीमॅट अकाउंट आणि म्यूचुअल फंड नॉमिनेशन
जर तुम्ही म्युच्यूअल फंडमध्ये पैसा गुंतवत असाल तर तुमच्याकडे नॉमिनीचं नाव जोडण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची वेळ आहे. डिमॅट खातेधारकांसाठी नामांकनाची अंतिम मुदत 3 महिन्यांनी वाढवून 31 डिसेंबर 2023 करण्यात आली होती. जर तुम्ही हे काम पूर्ण केले नाही तर तुमचे म्युच्युअल फंड खाते गोठवलं जाऊ शकतं.


तर यूपीआयचा वापर करु शकणार नाही
तुम्ही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी 31 तारीख खूप महत्त्वाची आहे. NPCI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एखादा वापरकर्ता त्याचा UPI आयडी वापरत नसेल तर त्याचं खातं निष्क्रिय केलं जाईल. तुम्ही गेल्या एका वर्षात तुमचा UPI आयडी वापरला नसेल, तर तो निष्क्रिय केला जाणार आहे. 


लॉकरचा सुधारित करारनामा 
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेत लॉकर असलेल्या सर्व ग्राहकांना सुधारित लॉकर करार सादर करावा लागणार आहे. याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. ग्राहकांना बँकेत जाऊन अपडेटेड करारनामा सादर करावा लागेल. जर तुम्ही हा निमय पाळला नाही तर तुम्हाला तुमचे लॉकर सोडावं लागेल. 


SBI अमृत कलश योजना
तुम्ही SBI च्या अमृत कलश योजनेचा लाभ 31 डिसेंबरपर्यंतच घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. ही 400 दिवसांची FD योजना आहे. यामध्ये ग्राहकांना बँकेकडून ७.६ टक्के दराने व्याजाचा लाभ मिळणार आहे.


आयकर रिटर्न भरणे
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै होती, पण ज्या ग्राहकांनी 31 जुलैपर्यंत आयटीआर भरला नाही ते 31 डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह फाइल करू शकतात. अन्यथा तुम्हाला दंड होऊ शकतो. तुम्ही तुमचा ITR 5000 रुपयांच्या दंडासह दाखल करू शकता.