सुरत, अहमदाबादमध्ये पाटीदार नेते आपसात भिडले
संतप्त पाटीदार कार्यकर्त्यांनी काँग्रेसची अहमदाबाद आणि सुरत मधील कार्यालयं फोडली.
अहमदाबाद : गुजरात निवडणूकीसाठी काँग्रेसनं जारी केलेल्या यादीत पाटीदार आंदोलनातल्या काही कार्यकर्त्यांना तिकीटं देण्यात आलं आहे. त्यामुळे संतप्त पाटीदार कार्यकर्त्यांनी काँग्रेसची अहमदाबाद आणि सुरत मधील कार्यालयं फोडली.
दोन्ही शहरांमध्ये पोलीसांनी बंदोबस्त वाढवला
यानंतर दोन्ही शहरांमध्ये पोलीसांनी बंदोबस्त वाढवलाय. काँग्रेसच्या तिकीटावर पाटीदार आंदोलनाचा नेता असणाऱ्या हार्दिक पटेलच्या जवळच्या लोकांनी थेट काँग्रेसचीच वाट धरल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
गुजरातच्या काही भागात पडसाद उमटण्याची शक्यता
दरम्यान, हार्दिक पटेल यांनी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना उत्तरं न दिल्यानं त्यांचा संताप वाढला आहे. आज सकाळी राज्यात विविध ठिकाणी याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.