राफेल डीलच्या भ्रष्टाचारात पंतप्रधानही जबाबदार- कॉंग्रेस
पंतप्रधान राफेल डीलच्या भ्रष्टाचारात जबाबदारही आहेत असा थेट आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे.
जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार नव्हे तर भ्रष्टाचाराच्या प्रकरणातले भागीदार आहेत आणि तेच राफेल डीलच्या भ्रष्टाचारात जबाबदारही आहेत असा थेट आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. राफेल डील भ्रष्टाचाराचे प्रकरण असून या प्रकरणात जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी संपूर्ण व्यवहाराची चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.
त्या नागपूर प्रेस क्लब मध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. भाजप विरोधी बाकांवर असताना खूप आरोप करायची मात्र आता प्रश्नांचे उत्तर देत नाहीये. राफेलच्या प्रकरणात काँग्रेसचे आरोप तथ्यांवर आधारलेले आहेत.
देशासोबत विश्वासघात
पंतप्रधान आणि त्यांच्या कार्यकाळातील तिन्ही संरक्षण मंत्र्यांनी देशासोबत विश्वासघात केले आहे. सैनिकांसोबत विश्वासघात केले आहे.आता पंतप्रधान आणि त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी या प्रकरणात संसदेची संयुक्त समिती केव्हा स्थापन करणार याचे उत्तर द्यावे अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे.
भविष्यात काँग्रेस पार्टी सत्तेत आली तर या प्रकरणाची सखोल चौकशी करू आणि गरज भासल्यास डील रद्द देखील करू असेही चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या.