नवी दिल्ली: मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि बहुजश समाज पार्टीशी आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं विधान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमालनाथ यांनी केलं आहे. भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि बसपा एकत्र येणं गरजेचं आहे असं कमलनाथ यांनी आधीच स्पष्ट केलं होतं.


सोनिया गांधी, मायावती यांच्यात सलोखा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कर्नाटकमध्ये जेडीएस आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या शपथविधीच्या वेळी सोनिया गांधी आणि मायावती यांच्यातला सलोखा कुणाच्याही नजरेतून चुकला नव्हता. मध्यप्रदेशात बसपाला गेल्या तीन निवडणुकांमध्ये सातत्याने सात टक्के मतदारांचा पाठिंबा मिळत आला आहे. काँग्रेसला २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत साधारण ३७ % मतं मिळाली होती. तर भाजपाला २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ४५ % मतं मिळली होती.


अँटीइन्कबन्सीचा फायदा घ्यायचा विचार


दरम्यान, पंधरा वर्षे सातत्याने सत्ता असल्याने प्रस्थापितांच्या विरोधात असणाऱ्या मतांचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसची बसपाशी चर्चा सुरु असून येत्या काही दिवसातच अतिंम चित्र स्पष्ट होईल.