मुंबई : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल (Punjab Election Result 2022) हाती येऊ लागला आहे. मतमोजणीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा जनसमर्थन मिळालेला दिसतोय. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचं (AAP) सरकार बनणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. पण पंजाबमध्ये एक अशी जागा होती. ज्या जागेवर अनेकांचं लक्ष होतं. अभिनेता सोनू सूदची बहिण (sonu sood sister)  देखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोगा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार असलेल्या मालविका सूद (Malavika Sood) पिछाडीवर आहेत. मोगा विधानसभा मतदारसंघ (Moga Assembly Seat)  आतापर्यंत अनेक वेळा काँग्रेसकडे राहिला आहे. 15 पैकी 10 वेळा काँग्रेसने येथून विजय मिळवला आहे. 1977 ते 2017 पर्यंत काँग्रेसने 6 वेळा येथून विजय मिळवला आहे. 2017 मध्ये हरजोत सिंग कमल यांनी निवडणूक जिंकली होती. पण यंदा काँग्रेसने यंदा अभिनेता सोनू सूदची बहिण मालविका सूद यांना उमेदवारी दिली होती.


पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. याशिवाय नवजोत सिंग सिद्धू, सुखबीर बादल, चरणजीत सिंह चन्नी आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा देखील यात समावेश आहे.


पंजाब विधानसभा निवडणुकीचा 10.30 वाजेपर्यंतचा निकाल (आघाडी)


काँग्रेस - 13
आप - 88
भाजप - 5
शिरोमणी अकाली दल - 10