नवी दिल्ली : काँग्रेसने भारतीय जनता पक्षाला एक मोठा जोरदार झटका दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील चित्रकूट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे.


चित्रकुट विधानसभेची जागा काँग्रेस आमदार प्रेम सिंह यांच्या निधनाने जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.


या जागेवर काँग्रेसचे प्रेम सिंह हे तीन वेळा निवडून आले होते. ही जागा काँग्रेसचा गड मानला जात असे. ९ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ६५ टक्के मतदारांनी मतदान केलं.



या जागेवर भाजपने शंकर दयाल त्रिपाठी आणि काँग्रेसने निलांशु चतुर्वेदी यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत एकूण १२ उमेदवार रिंगणात होते.



काँग्रेसचे उमेदवार निलांशु चतुर्वेदी यांनी भाजपच्या शंकर दयाल त्रिपाठी यांचा तब्बल १४ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आहे. मतमोजणीत पहिल्या राऊंडनंतरच काँग्रेसने आघाडी घेतल्याचं पहायला मिळालं. काँग्रेस उमेदवाराचा विजय झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.