नवी दिल्ली : कसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणा दरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांना उत्तर देताना काँग्रेसने या देशाचे तुकडे केले आहेत, अशी जोरदार टीका केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देत आहेत. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणा देत गोंधळ घातला. या घोषणाबाजीतच मोदींचे भाषण सुरु होते. त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसवर टीकाही केली. फाळणी हे काँग्रेसचेच पाप आहे. भारताचे विभाजन हे काँग्रेसचे पाप आहे, अशी टीका मोदी यांनी केली.


घराणेशाही करणाऱ्यांनी लोकशाहीबद्दल बोलू नये. ७० वर्षांच्या पापाची शिक्षा देशाला भोगावी लागतेय. आधीच्या सरकारने देशाचे तुकडे केले, असे पंतप्रधान मोदी म्हणालेत.


यावेळी अर्थसंकल्पात आंध्रप्रदेशला कमी निधी दिल्याने विरोधकांनी तीव्र नाराजी केली. यावेळी विरोधकांची लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. मोदीजी जुमले बाजी बंद करो, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्यात.