नवी दिल्ली : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्याविरुद्ध टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीमा ओलांडली... आपल्या वक्तव्यावर मोदींनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसनं मंगळवारी संसदेत केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांत हा मुद्दा उपस्थित झालाय. राज्यसभेत काँग्रेसचे नेते आनंद शर्मा  आणि गुलाम नबी आजाद यांनी पंतप्रधानांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.


गुजरात निवडणुकीदरम्यान 'पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानसोबत हात मिळवणी करत कट कारस्थान रचल्याचा आरोप केला... हा एक मोठा मुद्दा आहे' असं म्हटलंय. 


गुजरात विधानसभा निवडणुकीदरम्यान लावण्यात आलेले हे आरोप लोकशाही, राजकारण आणि देशासाठी योग्य नाही... देशाच्या प्रती मनमोहन सिंह यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाहीत... मोदींनी आपल्या या वक्तव्याबद्दल माफी मागावी, माफी मागितल्यानं त्यांच्या पदाची प्रतिष्ठा कमी होणार नाही, असं काँग्रेसनं म्हटलंय.