Congress Leader Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील त्यांचा सरकारी बंगला खाली केला आहे. खासदार म्हणून राहुल गांधी यांना 12, तुघलक लेन हा बंगला देण्यात आला होता. मोदी आडनाव प्रकरणात गुजरातमधील सूरत कोर्टाने दोषी ठरवत राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर खासदारकी रद्द झाल्याने त्यांना हा बंगला सोडावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सरकारी बंगल्याची चावी ते लोकसभा सचिवालयाला परत करणार आहेत. राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्यासोबत 10 जनपथ इथं शिफ्ट झालेत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्यांना नोसीट बजावण्यात आली होती. या नोटीसीनंतर राहुल गांधींनी आपला सरकारी बंगला खाली केला आहे.



मानहानीच्या फौजदारी प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. 27 मार्च रोजी त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीसही पाठवण्यात आली होती. या नोटीसमध्ये 22 एप्रिलपर्यंत सरकारी बंगला खाली करण्याचे आदेश देण्यात आले होते. राहुल यांनी शुक्रवारी त्यांचा बंगला रिकामी केला. ट्रकमधून सगळे साहित्य भरुन ते सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील घरी हलवले आहे. राहुल गांधी आता सोनिया गांधी यांच्यासोबत राहणार असल्याचे सांगितले जात आहे.



राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. वायनाड येथील जाहीर सभेत त्यांनी एक वक्तव्य केले होते. पैसे घेऊन परदेशात जाणारे लोक हे मोदी आडनावाचे कसे? असे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर सुनावणी करता सूरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.


दरम्यान, काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. देशभरात काँग्रेस नेत्यांनी सत्याग्रह आंदोलन केले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी काळे कपडे घालून राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध देखील केला होता.