10 वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मिझोराममध्ये पराभव
काँग्रेसला पराभवाचा धक्का
नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेस 3 राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येत असताना ज्या राज्यात काँग्रेसची 10 वर्षापासून सत्ता होती त्या राज्यात काँग्रेसला पराभवाचा धक्का बसला आहे. मिझोराम विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पायउतार व्हाव लागलं आहे. या राज्यात 10 वर्षापेक्षा अधिका काळ कोणताच पक्ष राहू शकलेला नाही. एकूण 40 जागांपैकी, 26 जागा मिझो नॅशनल फ्रन्टला मिऴाल्या आहेत. MNF ला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. मिझोराम विधानसभेत एकूण ४० जागा असून एमएनएफला २९ जागांवर आघाडी मिळाली आहे. मुख्यमंत्री लाल थनहवला यांचा चंफाई (दक्षिण) मतदारसंघात पराभव झाला आहे.
MNF चे अध्यक्ष जोरामथंगा यांनी म्हटलं की, 'आम्ही सरकार बनवल्यानंतर 3 प्रमुख गोष्टींना प्राधान्य देणार आहोत. सरकार बनताच दारुबंदी, रस्ते आणि सोशल इकोनॉमिक डेव्हलपमेंट प्रोग्रामवर लक्ष केंद्रीत करणार आहोत.'
आयजोलमध्ये मिझो नॅशनल फ्रंटच्या पक्ष मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मिझो नॅशनल फ्रंट राज्यात आपलं सरकार स्थापन करणार आहे. मिझोराममध्ये काँग्रेसला 5 जागा, भाजपला 1 जागा तर अन्यला 8 जागा मिळाल्या आहेत.