Congress MLA  Arrested: आसाम पोलिसांनी हिंदू समाजाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या एका आमदाराला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आमदार हा काँग्रेसचा आहे. आफताब उद्दीन मोल्ला असं अटक करण्यात आलेल्या आमदाराचं नाव असून त्याने हिंदू समाजाबरोबरच हिंदू मंदिरांबद्दल वादग्रस्त विधानं केली होती.


हिंदू समाजाविरोधात धक्कादायक विधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आमदार आफताब यांना 7 नोव्हेंबर रोजी गुवहाटी येथून अटक करण्यात आली. आमदार वाजेद अली चौधरी यांच्या निवासस्थानी असताना आफताब यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आफताब यांनी हिंदू समाजाविरोधात वादग्रस्त विधानं केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आफताब यांनी गोलपारा येथील एका जाहीर सभेमध्ये केलेल्या विधानावरुन त्यांना अटक झाली आहे.


नेमकं काय म्हटलं या आमदाराने?


गोलपारामधील सभेमध्ये काँग्रेसच्या या आमदाराने, "जिथे जिथे हिंदू असतात तिथं चुकीची काम होतात. मंदिरातील पुजारी बलात्कारी असतात," असं धक्कादायक विधान केलं होतं. याचविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.


पक्षाने मागितलं स्पष्टीकरण


काँग्रेस आमदाराविरोधात दिसपूर पोलीस स्टेशनमध्ये कलम 295(a), 153A(1)(b)/505(2)IPC) अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. आसाम काँग्रेसने या प्रकरणामध्ये आमदार आफताब यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. असं विधान नेमकं कोणत्या हेतूने आणि का करण्यात आलं याबद्दल पक्षाने आफताब यांना जाब विचारला असून लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे असे आदेश देण्यात आले आहेत.



पोलिसांनी वृत्ताला दिला दुजोरा


आसाममधील एका पोलीस अधिकाऱ्याने जालेश्वर मतदारसंघाचे आमदार असलेल्या आफताब यांना अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याचं 'आज तक'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.