नवी दिल्ली : जेडीएस आणि काँग्रेस कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणार आहे. पण राज्यात उपमुख्यमंत्री कोण होणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काँग्रेस आमदार दलित उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे तर लिंगायत आमदार लिंगायत उपमुख्यमंत्रीची मागणी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेडीएसचे नेते आणि कर्नाटकचे होणारे मुख्यमंत्री कुमारस्वामी मुस्लीम किंवा दलित उपमुख्यमंत्रीसाठी आग्रही आहेत. काँग्रेसचं म्हणणं आहे की, दलित सीएमच्या नावावर आधीच सहमत झालेलं आहे. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं पाहिजे. याबाबत काँग्रेस नेते गुंडु राव यांनी म्हचलं की उपमुख्यमंत्रीपादाचा निर्णय काँग्रेस हाय कमांड करतील.


कर्नाटकमध्ये काँग्रेसला अजूनही शंका आहे की, भाजप कुमारस्वामी यांना सरकार स्थापन करण्यापासून रोखू शकते. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यापासून लांब ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करु शकते. काँग्रेस नेते बी के हरिप्रसाद यांनी म्हटलं की, 'रेड्डी ब्रदर्स अजूनही काँग्रेस आणि जेडीएस आमदारांच्या संपर्कात आहेत.'