इंदूर : इंदूरच्या रऊ विधानसभा मतदार संघाचे विद्यमान काँग्रेस आमदार आणि उमेदवार जितू पटवारी यांचा समाजमाध्यमांवर वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये महिला मतदार पैसे घेऊन मतदान करतात असा आरोप केला. त्यावर उपस्थित महिलांचा संताप झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जितू पटवरींनीही आक्रमकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा कोणताही परिणाम होताना दिसत नाही. महिलांच्या आक्रमक पवित्रा बघून जितू पटवारीही सामोपचारानं घेण्याचा प्रयत्न करतात खरे...पण महिलांचा रोषाला त्यांना सामोरं जावं लागतं.