Shashi Tharoor : काँग्रेस नेते शशि थरुर (Shashi Tharoor) नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. नुकतंच त्यांनी कांग्रेस अध्यक्षपदासाठी (Congress President Election) आपलं नामांकन दाखल केलं आहे. शशी थरूर कायमच आपल्या हायफाय इंग्रजीसाठी ओळखले जातात. पण सध्या ते एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. याचं कारण आहे त्यांच्या गळ्यात लटकत असलेलं एक खास गॅजेट. हे कोणतं गॅजेट (Gadgets) आहे, ते काय काम करत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. काही जणांना वाटतं तो एक कस्टमाईज्ड स्मार्टफोन (Smartphone) आहे, तर काही जणांना वाटतं ते एक ट्रान्सलेशन डिवाइस (Translation Device) आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शशि थरुर यांच्या गळ्यात अनेकवेळा हे गॅजेट पाहिलं गेलं आहे. पण ते नेमकं आहे तरी काय, असा प्रश्न सामान्यांना पडलाय. हे गॅजेट आहे एअर प्युरिफायर (Air Purifier) म्हणजे हवा शुद्धीकरण यंत्र आहे. हे प्यूरीफायर तीन मीटर पर्यंतच्या परिसरातील हवा शुद्ध राखण्यास मदत करतं. गर्दीच्या ठिकाणी किंवा नेहमी घराबाहेर असणाऱ्या व्यक्तींसाठी हे गॅजेट खूपच उपयोगी आहे. 


या छोट्या आणि सहज वापरता येणाऱ्या एअर प्यूरीफायरचं नाव आहे Air Tamer Purifier. वायू प्रदूषण अधिक असलेल्या ठिकाणी हे गॅजेट उपयोगी ठरतं. तसंच आपल्या आसपास जेव्हा अनेक जण स्मोकिंग करत असतात तेव्हाही आपल्याला या गॅजेटचा उपयोग होतो. सामान्य एअर प्यूरीफायरच्या तुलनेत हे प्यूरीफायर अधिक उपयुक्त आहे. मनुष्याच्या नजरेस न पडणारं एक सर्कल तो गॅजेट वापरणाऱ्या व्यक्तीच्या आसापस निर्माण करतो. 


हे गॅजेट धुलीकण आणि प्रदूषणापासून बचाव करतं. यात ऑन-ऑफचं एक बटण आहे. यात चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट आहे. 150 तासांचा बॅटरी बॅकअप देखील मिळतो. म्हणजेच एका चार्जवर तुम्ही अनेक दिवस टेन्शन फ्री राहू शकता. पण या गॅजेटचं वजन थोडं जास्त आहे, त्यामुळे ते वापरणाऱ्या व्यक्तीची मान नक्कीच दुखू शकते. या गॅजेटची किंमत 9 हजार 999 पासून सुरु होते.