नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच नवी दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन होतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या ८४ व्या राष्ट्रीय अधिवेशनाची सुरुवात राहुल गांधी यांच्या अध्यक्षयीय भाषणाने होईल. आगामी पाच वर्षांत पक्षाची दिशा कशी असेल? हे राहुल गांधी या अधिवेशनात स्पष्ट करतील.


सोनिया गांधीही उपस्थित


काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारे राहुल गांधी यांचं भाषण असेल असं बोललं जातंय. राहुल यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर दुपारी सोनिया गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. 


सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत सोनिया भाष्य करतील. या भाषणात सोनिया गांधी या मोदी सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. तसंच विरोधकांना सोबत घेऊन जाण्याबाबतही सोनिया गांधी आपले विचार मांडतील. 


कार्यकर्त्यांना दिशा देणार राहुल गांधी?


यानंतर रविवारी दुपारी राहुल गांधी यांचं समारोपाचं भाषण होईल. सरकारच्या फसव्या योजना, बेरोजगारी, औद्योगिक पिछेहाट, जातीय दंगली आणि लोकशाहीला धोका अशा विविध मुद्यांवर राहुल गांधी मोदी सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. 


या अधिवेशनात आर्थिक आणि परराष्ट्र संदर्भातील विविध प्रस्ताव संमत करण्यात येतील. पाहूया कोणकोणते प्रस्ताव या अधिवेशात मांडण्यात येतील... 


सध्याची राजकीय परिस्थिती


- देशाची आर्थिक परिस्थिती


- परराष्ट्र धोरणासंदर्भात प्रस्ताव


- शेतकऱ्यांची अवस्था आणि कृषी क्षेत्र


- रोजगार


- गरिबी निर्मूलन