नवी दिल्ली : काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी आणखी एक उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमधून माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि काँग्रेसचे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीमधून मध्य प्रदेशातील ३, पंजाबमधील २ आणि जम्मू-काश्मीर तसेच बिहारमधील एका जागेवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशातील गुणा लोकसभा मतदारसंघातून आणि पंजाबमधील आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मध्य प्रदेशामधील विदिशा लोकसभा मतदारसंघातून शैलेंद्र पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


राजगड येथून मोना सुस्तानी, पंजाबमधील संगरूर येथून केवल सिंह ढिल्लन, बिहारमधील वाल्मिकी नगरातून शाश्वत केदार, जम्मू-काश्मीरमधील लद्दाखमधून रिगझिन स्पल्बर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.