नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला शह देण्यासाठी कॉंग्रेसने मोठी रणनीती आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचारादरम्यानचा अश्वरथ रोखण्यासाठी कॉंग्रेसही पुढे सरसावली आहे. कॉंग्रेसतर्फे आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आलीय. यामध्ये सहयोगी दलाच्या स्टार नेत्यांना सहभागी करून घेण्यात आलय. हे स्टार प्रचारक कर्नाटक विधानसभा निवडणुक कॅंम्पेनमध्ये भाजपाला कांटे की टक्कर देणार आहेत. या यादीत कॉंग्रेसने २२ नेत्यांना स्थान दिल आहे. ज्यामध्ये वरिष्ठ कॉंग्रेस नेता गुलाम नवी आझाद, सुशील कुमार शिंदे, सचिन पायलट, सिद्धू, ज्योतिरादित्य सिंधिया, अशोग गहलोत यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावे आहेत.

सहकारी पक्षांची मदत 



पण कर्नाटकचे रण जिंकण्यासाठी कॉंग्रेसला सहकारी पक्षांचीही मदत घ्यायची आहे. त्यामुळे या यादीत तीन पक्षांच्या नेत्यांची नावेदेखील आहेत. कॉंग्रेसकडून एनसीपी अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दल नेता तेजस्वी यादव आणि समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादवदेखील कर्नाटक प्रचारात उतरणार असल्याची चर्चा आहे. कॉंग्रेस सध्या या नावांवर विचार करतेय. या यादीत या तिघांची नावे असल्याने कॉंग्रेसला जिंकवण्यासाठी आणि भाजपाला हरविण्यासाठी विरोधक एकत्र आल्याचे चित्र स्पष्ट झाले. कर्नाटकमध्ये १२ मेला निवडणूका होणार आहेत. १५ मे ला याचे निकाल येतील. कॉंग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धारमैया तर भाजपातर्फे येदियुरप्पा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहेत.