नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात मोठी भूमिका बजावली असून या पक्षाने देशाला अनेक महापुरूष दिल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते सोमवारी RSS च्या दिल्लीतील अधिवेशनात बोलत होते. यावेळी मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांना सविस्तरपणे उत्तर दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तिरंग्याचा सन्मान करतो, भारत हिंदू राष्ट्र आहे, आणि राहील, आपल्याला आपल्या देशासाठी जगले पाहिजे. हिंदुत्व आपल्या समाजाला एकजुट ठेवते. संघ लोकांना कळत नाही, कारण संघ अनोखा आहे. सत्तेत कोण आहे यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. आम्ही फक्त आपले काम करतो असे भागवत यांनी म्हटले. 


तसेच संघ सर्वांत मोठी लोकशाही संघटना आहे. संघात लोकशाहीचे पालन केले जाते. संघाची कार्यपद्धती वेगळी आहे. आमच्याशी सहमत होण्यासाठी आम्ही कोणावर जबरदस्ती करत नाही. आम्ही योग्य असल्यानंतर लोक स्वत:हून सहमत होतील, असा विश्वासही यावेळी मोहन भागवत यांनी व्यक्त केला.