Congress President's Election : सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्या भेटीनंतर अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मवाळ भूमिका घेत काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या (Congress president's election) निवडणूकीतून माघार घेतली आहे. सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे अशोक गेहलोत यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राजस्थानमधील घटनेबद्दल मी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेसमध्ये मला आदर मिळत आहे. नेहमी माझ्यावर विश्वास ठेवून जबाबदारी दिली. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्यापासून आजपर्यंत माझ्यावर विश्वास होता. काँग्रेसचे सरचिटणीस ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यापर्यंतचा प्रवास हा हायकमांडच्या आशीर्वादानेच झाला आहे," असे अशोक गेहलोत म्हणाले.



"रविवारी घडलेल्या घटनेने मला हादरवून सोडले आहे. यातून मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, असा संदेश गेला. यासाठी मी सोनिया गांधी यांची माफी मागितली आहे. आमच्याकडे एक ओळीचा ठराव संमत करण्याचा प्रस्ताव आहे. दुर्दैवाने तो प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. मी पास होऊ शकलो नाही. मी मुख्यमंत्री म्हणून माझी चूक मान्य करतो. संपूर्ण देशात माझ्याबद्दल चुकीचे वातावरण तयार करण्यात आले आहे," असे अशोक गेहलोत म्हणाले.