नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधींची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष होणाऱ्या राहुल गांधींसमोर अनेक आव्हान आहेत. 


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची वेळ सोमवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत होती. मात्र, राहुल गांधी वगळता कोणत्याच काँग्रेस नेत्यानं अध्यक्षपदासाठी अर्ज भकरारला नाहीये.


यामुळे राहुल गांधीच काँग्रेसचे अध्यक्ष होणार हे निश्चित झालं आहे. आता केवळ औपचारीक घोषणाच बाकी आहे.


राहुल गांधीची बलस्थानं आणि कमकुवत बाजू त्याचप्रमाणे त्यांच्यासमोरील आव्हानावर एक नजर टाकूया...


राहुल गांधींसमोरील आव्हानं


  • नवे कार्यकर्ते आणि जुन्या नेत्यांची सांगड घालणं


  • पक्षाला आक्रमक विरोधी पक्ष म्हणून उभे करणं


  • अवघ्या पाच राज्यांपुरत्या उरलेल्या काँग्रेस पक्षाबद्दल जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणं


  • निवडणुकीत अपयश आल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, तामिळनाडू, मध्यप्रदेश, गुजरात आणि ओडिशात पक्षाला पुनरुज्जीवीत करणं


  • २०१९ लोकसभा निवडणुकीला १६ महिने राहिल्यानं इतर राज्यांत पक्षबांधणी मजबूत करुन युतीचा आढावा घेणं ही राहुल गांधींसमोरची काही प्रमुख आव्हानं आहेत.


राहुल गांधींची बलस्थानं


  • राहुल गांधी पन्नाशीच्या जवळ पोहोचले असले तरी काँग्रेसच्या तरुण फळीचा मोठा पाठिंबा राहुल यांना आहे.


  • गांधी घराण्याचा वारसदार असल्यानं गांधी घराण्याशी निष्ठावंत असणा-या सगळ्या कार्यकर्त्यांचं पाठबळ राहुल यांना आहे


  • युवकांशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर आहे.


  • कुठल्याही विशिष्ट समाजाच्या बाजूनं किंवा विरोधी अशी राहुल गांधींची प्रतिमा नाही


  • मेहनत आणि प्रयोग करण्याची त्यांची तयारी आहे


  • लोकशाही पद्धतीनं काम करण्याला त्यांची पसंती असल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे.



राहूल गांधींच्या रुपात १९ वर्षांनी काँग्रेस पक्षाला मिळणार नवा अध्यक्ष मिळणार आहे.