शरद पवार यांनी राहुल गांधी यांना हा दिला सल्ला
शरद पवार यांचा राहुल गांधी यांना सल्ला.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोदी झंझावादापुढे विरोधी पक्षांची वाताहात झाली. काँग्रेसला संसदेत विरोधी पक्षनेता पद मिळण्याएवढ्या जागाही मिळालेल्या नाहीत. तसेच काँग्रेसचा झालेला दारुण पराभवामुळे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी कमालीचे नाराज झालेत. त्यांनी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष बनविण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मी माझ्या राजीनाम्यावर ठाम आहे, असेही स्पष्ट केले. मात्र, त्यामुळे काँग्रेस अधिकच अचडणीत सापडला. अनेकांनी त्यांना आपला राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंतीही केली. मात्र, नाराजी काही दूर झाली नाही. आज राहुल गांधी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. यावेळी दिर्घ राजकीय चर्चा झाली. त्यावेळी शरद पवार राहुल यांना सल्ला दिला.
राहुल गांधी यांनी राजधानी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क काढले गेलेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करणार, अशी चर्चा सुरु झाली. मात्र, पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावले. त्याचवेळी पवार यांनी राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर परखड मत व्यक्त केले.
राहुल गांधी यांच्यासोबत दोन्ही सभागृहातील विरोधीपक्षनेतेपदाबाबत चर्चा झाली. बैठकीत महाराष्ट्रातील निवडणुकीवरही चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच राहुल गांधी यांच्या राजीनाम्याबाबत पवार यांनी भाष्य केले. काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असावी. तसेच पर्याय नसताना मैदान सोडणे योग्य नाही.