नवी दिल्ली : देशात आता ‘अच्छे दिन’ येणार असा भोंगा वाजवला गेला. मात्र, देशाचा आर्थिक विकासाचा दर लक्षात घेता अर्थव्यवस्था पंक्चर झाली आहे. हे सगळे भाजप सरकारमुळे झाले आहे, अशी जोरदार टीका काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आर्थिक विकास दराच्या घरणीवरून केंद्र सरकारवर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘अच्छे दिन’चा भोंगा वाजवणाऱ्या भाजप सरकारनेच अर्थव्यवस्था पंक्चर केली आहे. अर्थव्यवस्थेच्या या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, असा सवाल त्यांनी यावेळी केला. देशाच्या विकास दराच्या घसरणीवरून अर्थव्यवस्थेची बिकट अवस्था दिसून येत आहे. आर्थिक विकास दरात वाढ नाही, रूपयाचे मूल्यही घसरत आहे तर रोजगारही गायब आहेत, असे ट्विट प्रियंका गांधी वाड्रा यांनी केले आहे. 



जागतिक मंदी असल्याचे सांगून अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचा प्रयत्न भाजप सरकारकडून होत आहे, असे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. परंतु देशात मंदी आहे. त्यातच आता आणखी एक चिंताजनक वृत्त हाती आले आहे. देशाचा जीडीपी वाढण्याऐवजी घटला आहे. त्यामुळे मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. जीडीपी ५.८ वरुन ५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे भारताला आर्थिक मंदीचा फटका बसत आहे, हे स्पष्ट होत आहे. तसेच अर्थव्यवस्थेच्या बिकट अवस्थेसाठी जबाबदार कोण आहे हे आतातरी स्पष्ट करा, असेही त्या यावेळी म्हणाल्या.