...तर भाजप सत्तेच्या जवळही पोहोचू शकणार नाही : राहुल गांधी
आगामी लोकसभा निवडणुकांत भाजप सत्तेच्या जवळही पोहोचू शकणार नाही.
नवी दिल्ली : विरोधी पक्षांची उत्तरप्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात योग्य प्रकारे आघाडी झाल्यास, आगामी लोकसभा निवडणुकांत भाजप सत्तेच्या जवळही पोहोचू शकणार नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
देशातल्या भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याची रणनीती आखण्यावर काँग्रेसनं पूर्ण भर दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपला पराभूत करणं हे प्रथम उद्दीष्ट असून, लोकसभा निकालानंतर पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबतचा निर्णय घेतला जाईल, असंही राहुल गांधींनी स्पष्ट केले.