टीडीपीच्या अविश्वास प्रस्तावाला कॉंग्रेसचा पाठिंबा
टीडीपी केंद्र सरकारविरोधात आणणार असलेल्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलंय.
नवी दिल्ली : टीडीपी केंद्र सरकारविरोधात आणणार असलेल्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणार असल्याचं काँग्रेसनं सांगितलंय.
लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. एवढंच नाही तर इतर पक्षांनाही त्यासाठी सोबत घेऊ असं त्यांनी म्हंटलंय. सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी ५० खासदारांचा पाठिंबा लागतो. टीडीपीचे एकूण १६ खासदार आहेत.